क्रीडाविश्वमहाराष्ट्र

मोरावे गावासाठी खेळाच्या मैदानाचे लोकार्पण

  • महेंद्र शेठ घरत यांच्या प्रयत्नांना यश

उरण (विठ्ठल ममताबादे ) : सिडको ने सिमेंटची जंगले उभे केले मात्र येथील स्थानिक प्रकल्प प्रकल्पग्रस्तांसाठी खेळाची मैदाने सिडकोच्या आराखड्यामध्ये नाहीत. यासाठी कामगार नेते तसेच रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी अथक प्रयत्न केल्यानंतर सिडकोने मोरवे गावाकरता अधिकृत मैदान मंजूर करून देत माजी खासदार रामशेठ ठाकूर तसेच कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्याहस्ते या मैदानाच्या लोकार्पण कार्यक्रम १५ डिसेंबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी मोरावे ग्रामस्थांच्या वतीने मोठा सत्कार करण्यात आला.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते फीत कापून तसेच श्रीफळ वाढवून मैदानाचे उद्घाटन करण्यात आले तर कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्याहस्ते खेळपट्टीचे पूजन करून श्रीफळ वाढवून बॅटिंग केली. स्वर्गीय दि. बा. पाटील तसेच जनार्दन भगत साहेब यांनी या भागाला मोठा इतिहास दिलेला आहे. १९८४ च्या आंदोलनातील काही किस्से सांगत कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी अन्यायाविरुद्ध पेटून उठले पाहिजे आपला हक्क आपण मिळवलाच पाहिजे, या मैदानाकरिता मोराव्यातील ग्रामस्थांनी चिकाटी सोडली नाही त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करेन.असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी उत्तम कोळी श्रीकांत म्हात्रे,लहू मात्रे, मदन पाटील, नीलेश खारकर, धावजी पाटील, विनायक पाटील, चंद्रकांत म्हात्रे, सचिन म्हात्रे, मयूर म्हात्रे, यज्ञेश भोईर, प्रणय कोळी, संजय पाटील, अमर म्हात्रे, काशिनाथ म्हात्रे, मिलिंद म्हात्रे, चिंतामण गोंधळी, रुपेश ठाकूर, उमेश ठाकूर, संकेत भोईर त्याचबरोबर इतर मान्यवर उपस्थित होते.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button