इंडोको रेमेडिज कामगारांना ९६६५ रुपये वेतनवाढ
- महेंद्रशेठ घरत यांच्या संघटनेची यशस्वी मध्यस्थी
उरण दि.६ (विठ्ठल ममताबादे ) : कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या न्यू मॅरिटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून या वर्षातील १४ वा पगारवाढीचा करार आज करण्यात आला.
मे. इंडोको रेमेडिज पाताळगंगा या कंपनीतील कामगारांचा तीन वर्षांसाठी ९६६५ पगारवाढ तसेच ४४,००० रुपये बोनस देण्याचा करार कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात करण्यात आला.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या अध्यक्षतेखालील न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटना हि नेहमीच कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढत असते. कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करत असल्यामुळे स्थानिक कामगारांना जास्तीत जास्त आपल्या अनुभवाचा उपयोग करून कामगारांना सन्मानाची वागणूक मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यामध्ये ते सफल होत असतात.
मे. इंडोको रेमेडिज कंपनीतील कामगारांच्या पगारवाढीच्या करारनाम्या प्रसंगी न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष पी.के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील, व्यवस्थापनातर्फे निलेश भोले डेप्युटी जनरल मॅनेजर एच. आर चैताली पाटील , शानभाग साहेब कामगार प्रतिनिधी कैलास भालेकर, मधुकर रसाळ, किशोर पाटील, पी.सी.कोल्हे, दशरथ वाघे उपस्थित होते.