कोकणमहाराष्ट्रसाहित्य-कला

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार स्पर्धा

गणेश मंडळांनी ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत


रत्नागिरी दि. 26 (जिमाका) : गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी, पु. ल. देशपांडेमहाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इमेलवर 5 सप्टेंबर पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना सहभागी होता येईल. सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पुरस्कारासाठी निवड पुढील निकषांच्या आधारे करण्यात येईल.
पर्यावरणपूक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट (थर्माकोल/प्लॅस्टीक विरहीत), ध्वनीप्रदूषण रहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, इ.समाज सामाजिक सलोखा प्रबोधन, सजावट/देखावा किंवा स्वांतत्र्याच्या चळवळीसंदर्भात छत्रपती शिवाजी |महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट/देखावा, गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबीर, वर्षभरगड किल्ले, सवंर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौरउर्जाबद्दल, जागरुकता निर्माण करणे, अॅम्बुलन्स चालविणे, वैद्यकीयकेंद्र चालविणे सामाजिक, कार्यशाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी/ विद्यार्थिनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य, इत्यादीबाबत केलेले कार्य महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक /आरोग्य/ सामाजिक इत्यादीबाबत केलेले कार्य पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम / स्पर्धा पारंपरिक/ देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा.पाणी/ प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता आदी बाबींचा गुणांकनासाठी विचार केला जाणार आहे.
बाबींची पूर्तता करणाऱ्या/करु शकणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी करावयाच्या अर्जाचा नमुना या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट “अ” येथे आहे
जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येऊन जिल्हयातून एक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस राज्य समितीकडे करण्यात येऊन 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

तसेच राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास 5 लाख, द्वितीय क्रमांकास 2 लाख 50 हजार आणि तृतीय क्रमांकास 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून 202307041631182123 असा त्याचा संकेतांक क्रमांक आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button