उरणच्या श्रीराम मंदिरात अन्नकोट उत्सव

उरण दि २५(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील
श्रीराम मंदिर ट्रस्ट, गणपती चौक उरण शहर येथे श्रीराम मंदिरात अन्नकोट उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
अन्नकोट म्हणजे विविध पदार्थ तयार करून ते देवाला नैवेद्य दाखविणे होय.देव दिवाळी सणाच्या मुहूर्तावर अन्न कोटचे आयोजन अनेक ठिकाणी करण्यात येते. उरण शहरातील गणपती चौकातील श्रीराम मंदिरात 150 हुन अधिक पदार्थ अन्न कोट उत्सवा प्रसंगी ठेवण्यात आले होते. या पदार्थांचा नैवेद्य देवाला अर्पण करण्यात आला. यावेळी श्रीराम मंदिर ट्रस्ट, गणपती चौक उरणचे पदाधिकारी सदस्य, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरती झाल्या नंतर, देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर ते पदार्थ प्रसाद म्हणून भाविक भक्तांना वाटण्यात आले.
गेली २५ वर्षाहून जास्त वर्षे ही परंपरा चालू असून अन्नकोट उत्सवला हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीराम मंदिरात अन्नकोट उत्सव मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
- हेही अवश्य वाचा : Konkan Railway | रत्नागिरी-वैभववाडी दरम्यान १ डिसेंबरला रेल्वेचा अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’
- Konkan Railway | तीन महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ८६ लाख ६७ हजारांचा दंड वसूल
- Konkan Railway | ख्रिसमससाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी चार विशेष गाड्या



