कोकणमहाराष्ट्ररेल्वे

उरणमधील रेल्वे स्टेशन‌ला त्या-त्या महसूली गावांची नावे देणार

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे महेश बालदी यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन ; आ. महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश

उरण दि 23  (विठ्ठल ममताबादे ) :  उरण मध्ये रेल्वेचे काम वेगाने सुरु आहे. मात्र, उरणमधील अनेक रेल्वे स्टेशनला त्या त्या महसूली गावांची नावे न देता रेल्वे मंत्रालयातर्फे इतर गावांची नावे उरणमधील रेल्वे स्टेशनला देण्यात आले.  ज्या गावाच्या हददीत रेल्वे स्टेशन आहेत.त्या त्या गावाची नावे त्या त्या रेल्वे स्टेशनला देण्यात यावेत यासाठी बोकडविरा, नवघर, धूतुमच्या नागरिकांनी अनकदा आंदोलने केली. कायदेशीर विविध पत्रव्यवहार केला मात्र रेल्वे प्रशासनाकडून कोणाही योग्य तो प्रतिसाद धुतम, बोकडवीरा, नवघर ग्रामस्थांना मिळाला नाही.
नागरिकांची, जनतेची ही समस्या लक्षात घेऊन उरण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेश बालदी यांनी विधानसभेत या समस्येवर आवाज उठविला व ग्रामस्थांच्या,जनतेच्या मागणीचा विचार करून ज्या महसूल हद्दीत जे जे रेल्वे स्थानके आहेत त्या त्या स्थानकांना त्या त्या महसूली गावांची नावे देण्याची मागणी विधानसभेत केली तसेच स्थानिक पातळीवर रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनीही हा मुद्दा उचलून धरला.रेल्वे स्टेशनला त्या त्या महसूली गावांची नावे रेल्वे स्टेशनला देण्यात यावी यासाठी विजय भोईर यांनीही रेल्वे मंत्रालय, जिल्हाधिकारी आदी ठिकाणी पत्रव्यवहार केला होता.
सदर समस्या लवकर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली विजय भोईर यांच्या शिष्टमंडळाने केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची दिल्ली येथील निवास स्थानी भेट घेतली.सदर भेटीसाठी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मध्यस्थी केली. विनोद तावडे यांच्यामुळे रेल्वे मंत्री यांच्याशी महेश बालदी यांच्या शिष्ट मंडळाला भेट घेता आली.आमदार महेश बालदी, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, भाजपाचे उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, बोकडविरा गाव अध्यक्ष मनोज पाटील, माजी उपसरपंच गणेश वाजेकर,माजी उपसरपंच शरद ठाकूर व वेगवेगळ्या गावचे प्रतिनिधी यांनी सदर रेल्वे नामांतराची समस्या केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या कानावर घातली. समस्या ऐकून घेतल्यानंतर केंद्रीय  रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सदर समस्या त्वरीत सोडविण्याचे आश्वासन दिले.
सदर गोष्टीत मी स्वत: जातीने लक्ष घालून उरण विधान सभा मतदारसंघातील जनतेला न्याय देईन, असे अश्विनी वैष्णव यांनी शिष्ट मंडळाला आश्वासित केले.आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नामुळे लवकरच त्या त्या महसूली गावांची नावे त्या त्या हद्दीतील रेल्वे स्टेशनला देण्यात येणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button