एसटीच्या ताफ्यात नव्या हिरकणी बसेस

मुंबई : काळानुसार बदलाचा ध्यास घेतलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेत नव्या श्रेणीतील हिरकणी बसेस आणल्या आहेत. नव्या रूपातील हिरकणी बसेससह एसटी महामंडळाच्या ताफ्यात ई बसेस तसेच सीएनजी वर चालणाऱ्या नवीन पर्यावरणपूरक गाड्या प्रवाशांच्या सेवेत टप्प्याटप्प्याने आणण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर तोट्याच्या खाईत गेलेल्या एसटी महामंडळाने आर्थिक अडचणीतून सावरण्यासाठी प्रवाशांना आपल्याकडे खेचण्याकरिता नवनवीन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. काळानुसार बदलताना सीएनजी इंधनावर चालणाऱ्या तसेच इलेक्ट्रिक बसेस प्रवाशांच्या सभेत दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
जुन्या श्रेणीतील हिरकणी बसेसची जागा आता नव्या रूपातील हिरकणी बसेस घेणार आहे. नव्या हिरकणी बसेसची रंगसंगती प्रवाशांना आकर्षित करेल, असा विश्वास राज्य परिवहन महामंडळाने व्यक्त केला आहे. नव्या हिरकणी बसेस महाराष्ट्राच्या विविध मार्गांवर धावताना पाहायला मिळणार आहे.



