काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांनी घेतली कामगार नेते महेंद्र घरत यांची भेट

उरण दि १२ (विठ्ठल ममताबादे ) : माजी मंत्री,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांनी रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची शेलघर येथील निवास्थानी भेट घेऊन मावळ लोकसभेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी शिवरकर यांना सांगितले की, उरण विधानसभा मतदारसंघातून किमान ४० ते ५० हजार मतांची आघाडी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंना देणार असल्याचा विश्वास दिला.
यावेळी बाळासाहेब शिवरकर यांचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष आखलाक सिलोत्री, रायगड जिल्हा उपाध्यक्ष किरिट पाटील , जिल्हा सरचिटणीस वसंत म्हात्रे व मोठया संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
- हे सुद्धा वाचा : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली!
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ



