कोकण

कुंडी येथील केदारलिंग मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न

मंदिर जीर्णोद्धार सोहळ्यात विविध कार्यक्रम उत्साहात

देवरूख : (सुरेश सप्रे) : सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या कुंडी गावात ग्रामदेवतेचे मंदिर ग्रामस्थांच्या सहकार्यातून व सुरेश उर्फ बारक्याशेठ बने यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा मान्यवर व मानकर्‍यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कुंडीचे ग्रामदैवत श्री देव केदारलिंग मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा 14 व 15 मे रोजी झाला. मूर्तींची सवाद्य मिरवणूक, मंदिर प्रदक्षिणा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा, होमहवन, अभिषेक, सत्यनारायण पूजा, कलशारोहण, स्वागत व सत्कार समारंभ, हळदीकुंकू, माळवाशीतील हरिपाठ, खेडशी येथील नमन असे दोन दिवस विविध कार्यक्रम झाले. गावातील सर्व माहेरवाशीणींना साडी-चोळी देवून सन्मानित करणेत आले. तसेच माळवाशीच्या हरिपाठ करणार्‍या वारकर्‍यांसह नमन मंडळातील कलाकारांना या कार्यक्रमात गौरवण्यात आले.

सोहळ्याचे स्वागताध्यक्ष व माजी आम. डॉ. सुभाष बने, माजी जि. प. सदस्य सुरेश बने, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, मंडळाचे अध्यक्ष सदानंद बने गावप्रमुख हरिश्चंद्र सावंत, गावकर रामचंद्र लोकम, सरपंच दिलीप लोकम, पोलिस पाटील धीरेंद्र मांजरेकर, दिनकर सावंत, शशिकांत सावंत, दाजी सावंत, विठोबा सावंत, सूर्यकांत सावंत, श्रीधर भुवड, विलास कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सह्याद्रीत बांधलेले हे मंदिर बारक्याशेठ बने यांच्या कल्पक दृष्टीकोनातून या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. या मंदिरावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरली.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button