रत्नागिरी : मडगाव येथून मुंबई सीएसएमटीला जाणारी वंदे भारत एक्सप्रेसचा (22230) दि ५ ऑक्टोबर रोजीचा प्रवास निर्धारित स्थानकाआधी दादरला, सावंतवाडी- दादर तुतारी एक्सप्रेसचा प्रवास पनवेलला तर मडगाव- सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेसचा प्रवास देखील आज रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ऐवजी पनवेल स्थानकातच संपणार आहे. एमएसएमटी नजीकच्या वाडी बंदर यार्डातील कामानिमित्त हा बदल करण्यात आला आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनजीकच्या वाडी बंदर यार्डामधील रेल्वे लाईन 3 ते 7 साठी कनेक्टिव्हिटीचे काम हाती घेण्यात आली आहे. यासाठी दि. 5 ऑक्टोबर रोजी मडगाव ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास सीएसएमटी ऐवजी दादर जंक्शनला संपवण्यात येणार आहे. दि. ५ व ६ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरू होणाऱ्या सावंतवाडी रोड -दादर तुतारी एक्सप्रेसचा प्रवास देखील दादर ऐवजी पनवेल स्थानकात तर मडगाव ते सीएसएमटी दरम्यान दररोज धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस दिनांक 7 ऑक्टोबर रोजी आपला प्रवास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ऐवजी दादर जंक्शनला संपवणार आहे.
तुतारीसह जनशताब्दी एक्सप्रेस पनवेल येथून सुटणार!
या संदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दि. ७ व ८ ऑक्टोबर रोजी दादर ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणारी तुतारी एक्सप्रेस दादर ऐवजी पनवेल स्थानकातून आपला प्रवास सुरू करणार आहे.
याचबरोबर दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस सीएसएमटी ऐवजी पनवेल येथूनच मडगावसाठी मार्गस्थ होणार आहे.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.