कोकणदेश-विदेशमहाराष्ट्ररेल्वे
कोकण रेल्वेकडून वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वागत समारंभाचे आयोजन
शुभारंभ फेरीसाठी चिपळूण व कोलाडला विशेष थांबे

रत्नागिरी : मडगाव ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ दि.3 जून २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. कोकण रेल्वे मार्गावर प्रथमच धावणाऱ्या या गाडीच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
गोव्यात मडगाव स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 3 जून 2023 रोजी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड तसेच कोलाड स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कोकण रेल्वे कडून याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
दरम्यान, वंदे भारत एक्सप्रेस च्या शुभारंभ फेरीसाठी कोकण रेल्वेने चिपळूण तसेच कोलाड रेल्वे स्थानकावर विशेष थांबे दिले आहेत.



