कोकण रेल्वे मार्गावरील आणखी एका एक्सप्रेसला शुक्रवारपासून नवीन एलएचबी तंत्रज्ञानाचे कोच!
- एर्नाकुलम- ओखा द्वि साप्ताहिक एक्सप्रेसला जोडणारा नवे एल एच बी डबे
रत्नागिरी /मुंबई : एरणाकुलम ते ओखादरम्यान कोकण रेल्वे मार्गे धावणारी लांब पल्ल्याची आणखी एक एक्सप्रेस गाडी शुक्रवार दि. ५ एप्रिल २०२४ पासून नव्या रंगरूपात धावणार आहे.
भारतीय रेल्वेच्या विविध मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांचे पारंपरिक रेक बदलून त्या ठिकाणी नवीन जर्मन तंत्रज्ञाने बनवलेल्या एल एच बी गाड्या चालवल्या जात आहेत. रेल्वेच्या या धोरणानुसार कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या देखील एल एच बी डब्यांच्या चालवल्या जात आहेत.
रेल्वेच्या राजकोट झोनकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 16 337 /16 338 ही ओखा ते एरणाकुलम दरम्यान आठवड्यातून दोन दिवस धावणारी गाडी आता नव्या रंगरूपात एलएचबी तंत्रज्ञानाचा रेक वापरून चालवली जाणार आहे.
एरणाकुलम ते ओखा दरम्यान धावताना ही गाडी दिनांक ५ एप्रिल 2024 पासून तर ओखा ते एरणाकुलम या फेरीत ती दिनांक 8 एप्रिल 2024 पासून एल एच बी होणार आहे. जुन्या पारंपारिक रेकमधील प्रवासाच्या तुलनेत एल एच बी श्रेणीतील गाड्या या अधिक आरामदायी आणि सुरक्षेच्या दृष्टीने अधिक अनुकूल बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार एकूण 22 एल एच बी डब्यांची ही गाडी असेल
एर्नाकुलम ओखा एक्सप्रेस थांबते या स्थानकांवर!
दक्षिणेतील एरणाकुलम येथून निघणारी ही गाडी मडगाव, थिवी, कणकवली, रत्नागिरी, माणगाव, पनवेल, भिवंडी, रोड, वसई रोड, बोईसर, वलसाड, नवसारी, सुरत, वडोदरा आदी थांबे घेत ओखा जंक्शनला तिचा प्रवास संपतो.