कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसची नियमित सेवा लांबणीवर?
५ जूनपासून सुरू होणार होती नियमित सेवा
रत्नागिरी : ओडिशा मधील भीषण रेल्वे दुर्घटनेमुळे काल दिनांक 3 जून रोजी होणारे मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेस उद्घाटन रद्द झाले असताना दि. ५ जूनपासून मुंबई मडगाव मार्गावरील नियमित सेवा देखील लांबणीवर पडणार असल्याचे बोलले जात आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस से उद्घाटन दिनांक 3 जून रोजी मडगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. मात्र उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला ओडिशामध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाल्यामुळे मडगावमध्ये वंदे भारत एक्सप्रेसचे होणारे उद्घाटन रद्द करण्यात आले. या फोटोपाठोपाठ त्याच रात्री वंदे भारत एक्सप्रेसचा रिकामा रेक मुंबईला नेण्यात आला. त्यामुळे रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळालेल्या वेळापत्रकानुसार वंदे भारत एक्सप्रेसची नेहमीत सेवा कोणत्याही उदघाटना शिवाय दिनांक 5 जून पासून सुरू होईल असे सांगितले जात होते. मात्र दिनांक ४ जून पर्यंतच्या दुपारपर्यंत ही गाडी रेल्वेच्या संगणकीय आरक्षण प्रणालीवर ( पीआरएस) उपलब्ध न झाल्यामुळे आता दिनांक पाच जून रोजी शक्यता असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या नियमित फेऱ्या देखील होल्डवर ठेवण्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आता ही गाडी नेमकी कोणत्या तारखेला नेहमीत सेवेसाठी धावते याबाबत प्रवाशांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.