कोकणमहाराष्ट्ररेल्वे

कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी १५६ गाड्या विशेष गाड्या धावणार!

संपूर्णपणे अनारक्षित मेमू गाडीचाही समावेश

रत्नागिरी : यंदाच्या गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना बाप्पा पावला आहे. सप्टेंबर-२०२३ च्या गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वे १५६ गणपती विशेष गाड्या चालवणार आहे.

१) मुंबई-सावंतवाडी रोड स्पेशल (४० फेऱ्या)


01171 स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) पर्यंत दररोज 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 14.20 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

01172 स्पेशल सावंतवाडी रोडवरून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) दररोज 15.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

संरचना: 18 स्लीपर क्लास, एका गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार.

2) लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (24 फेऱ्या)


01167 स्पेशल एलटीटी वरून 13, 14, 19, 20, 21, 24, 25, 26, 27, 28 सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये 1.10, 2.10.2023 (12 ट्रिप) रोजी 22.15 वाजता सुटेल आणि आणि कुडाळला दुसऱ्या दिवशी 09.30 वाजता पोहोचेल

01168 स्पेशल कुडाळ येथून 14, 15, 20, 21, 22, 25, 26, 27, 28, 29 आणि 2 आणि 3 ऑक्टोबर ला 10.30 वाजता सुटेल. (12 ट्रिप) त्याच दिवशी 21.55 वाजता एलटीटीला पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा. माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग.

संरचना:एक दृतिया वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, 10 शयन्यान, 2 गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 7 सामान्य द्वितीय श्रेणी.

३) पुणे-करमाळी/कुडाळ-पुणे विशेष (६ सेवा)


01169 विशेष गाडी 15.09.2023, 22.09.2023 आणि 29.09.2023 रोजी पुण्याहून 18.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10.00 वाजता कुडाळला पोहोचेल.

01170 स्पेशल कुडाळहून 17.09.2023, 24.092023 आणि 01.10.2023 रोजी 16.05 वाजता सुटेल आणि पुण्याहून दुसऱ्या दिवशी 05.50 वाजता पोहोचेल.

थांबे: लोणावळा, पनवेल, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग.

संरचना:एक दृतिया वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित , 11 शयन्यान, 6 जनरल सेकंड क्लाससह 2 गार्ड्स ब्रेक व्हॅन.

४) करमाळी-पनवेल-कुडाळ विशेष (साप्ताहिक) – ६ सेवा


01187 स्पेशल 16.09.2023, 23.09.2023 आणि 30.09.2023 (3 ट्रिप) रोजी करमाळी येथून 14.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 02.45 वाजता पनवेलला पोहोचेल.

01188 स्पेशल पनवेलहून 17.09.2023, 24.09.2023 आणि 1.10.2023 (3 ट्रिप) रोजी 05.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 14.00 वाजता कुडाळला पोहोचेल.

थांबे: थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, काकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, रोहा आणि माणगाव.

संरचना: एक दृतिये वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित , 11 शयन्यान क्लास, 2 गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 6 सामान्य द्वितीय श्रेणी.

५) दिवा – रत्नागिरी मेमू स्पेशल (४० सेवा)


01153 स्पेशल दिवा येथून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) दरम्यान 07.10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 14.55 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

01154 विशेष गाडी 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) दरम्यान 15.40 वाजता रत्नागिरीहून सुटेल आणि त्याच दिवशी 22.40 वाजता दिवा येथे पोहोचेल.

थांबे: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

संरचना: 12 कार मेमू रेक

६) मुंबई – मडगाव विशेष साप्ताहिक ४० सेवा


01151 स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) पर्यंत दररोज 11.50 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 02.10 वाजता मडगावला पोहोचेल.

01152 स्पेशल मडगावहून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) दररोज 3.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 17.05 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी.

संरचना: 18 शयनयान क्लास, एका गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार.

आरक्षण: सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्क आकारून सर्व गणपती स्पेशलसाठी बुकिंग 27/06/2023 रोजी खुले होणार आहे.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी प्रवाशांना www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करून अधिक माहिती मिळवता येईल.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button