- लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान २४ विशेष फेऱ्या
- विशेष फेऱ्यांपैकी शेवटची फेरी २९ जूनला
मुंबई – उन्हाळ्या हंगामातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान 24 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे. दिनांक 11 एप्रिल 2024 पासून या विशेष गाड्यांच्या फेऱ्या सुरू होणार आहेत.
यासंदर्भात मध्ये रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेतः
लोकमान्य टिळक टर्मिनस-कोचुवेली साप्ताहिक विशेष (२४ फेर्या)
01463 साप्ताहिक विशेष दि. ११.०४.२०२४ ते दि. २७.०६.२०२४ पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई १६.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २०.४५ वाजता कोचुवेली येथे पोहोचेल.
01464 साप्ताहिक विशेष कोचुवेली दि. १३.०४.२०२४ ते दि. २९.०६.२०२४ पर्यंत दर शनिवारी १६.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २१.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
समर स्पेशल गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडुपी, मंगळुरु जंक्शन, कासरगोड, कण्णूर, कोषिक्कोड, तिरूर, षोरणूर, त्रिसूर, एरणाकुलम जं, कोट्टानम तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायमकुलम आणि कोल्लम जं.
या विशेष गाडीला प्रथम वातानुकूलित, १ प्रथम वातानुकूलित कम वातानुकूलित द्वितीय, २ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ८ जनरल सेकंड क्लास डबे जोडण्यात येणार आहेत.
- हे सुद्धा वाचा : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली!
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
आरक्षण : उन्हाळी विशेष ट्रेन 01079 आणि 01463 साठी विशेष शुल्कावर बुकिंग दि. ०८.०४.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल. विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.