- दिल्लीकडे जाणारी मंगला एक्सप्रेस पावणे दोन तास रोखून ठेवणार!
- तिरूनेलवेली-गांधीधाम एक्सप्रेसलाही बसणार विलंबाचा फटका
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या आरवली ते रत्नागिरी सेक्शन दरम्यान दि. १२ एप्रिल २०२४ रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक कोकण रेल्वेकडून घेतला जाणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७ ते सकाळी ९.३० असा अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
- १) या मेगाब्लॉकमुळे 12 617 ही एर्नाकुलम ते हजरत निजामुद्दीन अशी दैनंदिन धावणारी दिनांक ११ रोजी प्रवासाला निघणारी मंगला एक्सप्रेस मडगाव ते रत्नागिरी दरम्यान १ तास ४५ मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.
- २) मंगला एक्सप्रेस बरोबरच 20923 हे तिरूनेलवेली ते गांधीधाम दरम्यान धावणारी लांब पल्ल्याची एक्सप्रेस गाडी जिचा प्रवास 11 एप्रिल रोजी सुरू होतो ती दिनांक 12 रोजी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान एक तास दहा मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.
- हे सुद्धा वाचा : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली!
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ