कोकणपर्यटनब्रेकिंगमहाराष्ट्ररेल्वे
कोकण रेल्वे मार्गावर २२ डब्यांच्या विशेष गाड्या उद्यापासून धावणार!
रत्नागिरी : उन्हाळी हंगामात कोकण रेल्वे मार्गावर वाढलेली गर्दी लक्षात घेऊन मडगाव ते पनवेल तसेच पनवेल ते सावंतवाडी अशा दोन विशेष गाड्या उद्या दिनांक 6 मे 2024 पासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर सर्वच गाड्यांना सध्या उन्हाळी अंगामुळे गर्दी होताना दिसत आहे. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहयोगाने मडगाव ते पनवेल (01158/01157) तसेच पनवेल ते सावंतवाडी (01159/01160) दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. दिनांक ६ मे २०२४ पासून या गाड्यांच्या फेऱ्या सुरू होत आहेत. 22 एलजीबी डब्यांच्या या गाड्या असतील. यामध्ये स्लीपर दहा, जनरल आठ तर एस एल आर दोन अशी कोच रचना असेल.