कोकणमहाराष्ट्रशिक्षणसाहित्य-कला

चित्रकार प्रवीण मिसाळ यांचे जहांगीर कलादालनात चित्र प्रदर्शन

मिसाळ हे सह्याद्रि स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी

संगमेश्वर : चित्रकार प्रविण मिसाळ यांचे जहांगिर कलादालनात दि. ३० मे ते ५ जून २०२३ या कालावधीत  चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आली आहे

सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे या चित्र शिल्प कालामहाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले अनेक होतकरू विद्यार्थी आज अनेक उच्च ठिकाणी कार्यरत आहेत. कलाशिक्षक, कलाप्राद्यापक, कलासमीक्षक, चित्रपट निर्मिती, नामवंत चित्रकार, शिल्पकार अशा अनेक क्षेत्रात आपल्या कलेचा ठसा उमटवून स्वतः बरोबर आपल्या कलामहाविद्यालयाची देखील मान उंचावली आहे.असाच एक नामवंत चित्रकार प्रविण मिसाळ यांचे चित्रकलेचे शिक्षण कोकणातील अग्रगण्य कलामहाविद्यालय सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे या ठिकाणी झाले.तसेच पुढील कलेचे शिक्षण सर. ज. जी कलामहाविद्यालय मुंबई येथून पूर्ण केले.कलामहाविद्यालयातील शास्त्रोक्त शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मुक्त कलाकार म्हणून कलानिर्मित करण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक व्यक्तीक चित्रप्रदर्शनानंबरोबर समूह प्रदर्शने देखील केली व त्यातून त्यांच्या अनेक कलाकृतींची देश विदेशात विक्री झाली व त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली.

चित्रकार प्रविण मिसाळ यांची कलानिर्मिती हि सातत्याने सुरु असून असेच एकल चित्र प्रदर्शन संवेद्य नावाने दि.३० मे २०२३ ते ५ जून २०२३ यामध्ये भारतातील नामवंत जहांगीर कलादालन, मुंबई येथे सुरु झाले आहे.

या प्रदर्शनाच्या उदघाट्न प्रसंगी उदघाटक म्हणून सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट चे चेअरमन व कोकणातील ज्येष्ठ सुप्रसिध्द शिल्पकार / चित्रकार/ कला समीक्षक प्रकाश अर्जुन राजेशिर्के तसेच सर जे .जे . स्कूल ऑफ आर्टचे डीन विश्ववनाथ साबळे,सर जे .जे . स्कूल ऑफ आर्टचे माजी प्राध्यापक चित्रकार मधुकर मुंडे, सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश वाघमारे यांचे शुभहस्ते झाले.

चित्रकार हा संवेदनशील असतो. व आपल्या संवेदना तो आपल्या कलेतून प्रगट करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो. चित्रकार प्रविण मिसाळ यांनी देखील रंग, रेषा, पोत यांच्या द्वारे आपल्या मनातील संवेदना चित्रातून उमटविल्या आहेत. व चित्र प्रदर्शनाला संवेद्य हे नाव दिले आहे. सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के , सौ. पूजाताई निकम, कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव यांनी चित्रकार प्रविण मिसाळ यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button