कोकणपर्यटनमहाराष्ट्ररेल्वे

कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या जबलपूर एक्सप्रेसच्या फेऱ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्ग धावणारी जबलपूर ते कोईमतुर जंक्शन ही लांब पल्ल्याची गाडी आता डिसेंबर अखेरपर्यंत या मार्गावरून धावणार आहे.

मागील वर्ष दीड वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून जबलपूर एक्सप्रेस ते कोईमतुर लांब पल्ल्याची गाडी कोकण रेल्वे मार्गावरून धावत आहे. विशेष गाडी म्हणून ही गाडी चालवली जात आहे. मात्र या गाडीला लागत असलेल्या प्रतिसाद लक्षात घेऊन या गाडीच्या फेऱ्या आता डिसेंबर अखेरपर्यंत वाढवण्यात
आल्या आहेत. यासाठी कोकण रेल्वे या गाडीचे पावसाळी यातील तसेच पावसाळ्याव्यतिरिक्त चे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. कोकण रेल्वे ममार्गे धावरी ही गाडी 02198 / 02197 या क्रमांकानी चालवली जाते.

जबलपूर-कोईमतुर एक्सप्रेसचे थांबे

नरसिंहपूर, गाडरवारा, पिपरिया, इतारसी जंक्शन, हरदा, खंडवा, भुसावळ जंक्शन, नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिवी, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, मूकांबिका रोड बायंदूर, कुंदापूर, उडुपी, मुळकी, मंगळुरू जंक्शन, कासरगोड, कन्नूर, वडकरा, कोझिकोड, तिरूर, शोरनूर जंक्शन आणि पालघाट.

२४ डब्यांच्या या गाडीची अशी आहे रचना

  • फर्स्ट एसी: १ डबा
  • दोन टियर एसी: २ डबे
  • तीन टियर एसी: ६ डबे
  • स्लीपर: ११ डबे
  • जनरल: २ डबे
  • एसएलआर: २ डबे

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button