कोकण विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची आज बैठक
नवी मुंबई, दि.19 : कोंकण विभागातल्या जिल्हास्तरावरील भ्रष्टाचार निर्मुलन समितीने दिलेल्या निर्णयाने समाधान न झालेल्या तक्रारदारांसाठी कोंकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षेतेखाली विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक सोमवार दि.22 मे 2023 रोजी दुपारी 12.30 वा. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पहिला मजल्यावरील समिती सभागृहात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कोंकण विभागीय उप आयुक्त (महसूल), तथा सदस्य सचिव यांनी दिली आहे.
कोंकण विभागातील ज्या नागरिकांना शासनाच्या निरनिराळया कार्यालयातील कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांच्या कामकाजाबाबत विलंब, गैरव्यवहार, अकार्यक्षमता व इतर कारणाने होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबतच्या तक्रारी द्यावयाच्या असतील त्यांनी त्यांच्या लेखी स्वरुपातील तक्रारी आवश्यक त्या पुराव्यासह प्रथमत: आपल्या जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे सादर कराव्या. जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीने दिलेल्या निर्णयाने समाधान न झालेल्या तक्रारदारांनी दि. 22 मे 2023 रोजी वर नमूद बैठकीच्या पत्त्यावर आयोजित बैठकीच्या वेळेपूर्वी समितीसमोर सदर लेखी तक्रार दोन प्रतीत समक्ष द्याव्यात. असे आवाहन कोंकण विभागीय उप आयुक्त (महसूल), तथा सदस्य सचिव मकरंद देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.



