रत्नागिरी : मंगळवार दिनांक १६ जानेवारी २०२४ रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आवारामधील कौशल्य विकास केंद्रातील विद्यार्थ्यांनी रत्नागिरीया माळनाका येथील प्रसिद्ध हॉटेल विवेकला इंडस्ट्रियल भेट दिली.
या भेटीमध्ये कौशल्य विकास केंद्रातील फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह, फ्रंट ऑफिस असोसिएट, कॉमिस शेफ, असिस्टंट शेफ, हाऊस किपिंग सुपरवायझर या बॅचमधील ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष कामकाज कसे चालते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी कौशल्य विकास केंद्राच्या शिक्षक वर्गाने विद्यार्थ्यांना सर्व विभाग दाखवून विस्तृत महिती दिली.
या वेळी हॉटेल विवेकच्या प्रत्येक विभागाच्या स्टाफने रिसेप्शन, फ्रंट ऑफिस, रेस्टॉरंट, बॅक सर्व्हिस या विभागांमध्ये कशा प्रकारे कामकाज चालते याविषयी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह महिती दिली.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना आजच्या भेटीमध्ये या क्षेत्रातील नवनवीन माहिती अनुभवायला मिळाली याबद्दल हॉटेल विवेक व कौशल्य विकास केंद्र यांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी हॉटेल विवेकचे मालक श्री. विक्रांत देसाई, श्री. विशाल देसाई तसेच श्री. विनय देसाई यांनी विशेष सहकार्य केले.
तसेच कौशल्य विकास केंद्राचे प्रशासक श्री.महेश बेडेकर यांनी मनोगत व्यक्त करताना आजच्या इंडस्ट्रियल भेटीमुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या संधींची माहिती होण्यास होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला आणि हॉटेल व्यवस्थापनाचे आभार मानले.
या प्रसंगी सर्व विद्यार्थी, हॉटेल विवेकचे मालक श्री. विक्रांत देसाई, श्री. विशाल देसाई, श्री. विनय देसाई, हॉटेलमधील सर्व कर्मचारी, कौशल्य विकास केंद्राचे व्यवस्थापक/प्लेसमेंट मॅनेजर श्री.महेश बेडेकर, शिक्षकवर्ग श्री. अमेय मुळ्ये, श्री.ऋषिकेश मेहेंदळे, श्री. रूत्वेज शिरधनकर, श्री. श्रीनिवास माने, श्री. अमित धाटावकर, सौ. अमृता साळवी, कर्मचारी रियाझ सावकार आदी मान्यवर उपस्थित होते.