जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज इन्स्टिट्यूटमध्ये ११ वी प्रवेश सुरू
नाणीज : येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या इंग्रजी माध्यम प्रशालेत ११ वी प्रवेश सुरू झाले आहेत. संस्थांतर्फे ही शाळा चालवली जाते.
नाणीज या ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकता यावे म्हणून जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी २००९ सालापासून येथे ही प्रशाला सुरू केलेली आहे. या प्रशालेच्या माध्यमातून नर्सरी ते बारावी (कॉमर्स /सायन्स) पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते.
आता यावर्षी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी इयत्ता अकरावी सायन्स (स्टेट बोर्ड) आणि इयत्ता अकरावी कॉमर्स (सीबीएससी बोर्ड) यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
सर्व प्रवेश दहावीच्या गुणांवर आधारीत मेरिटनुसार देण्यात येतील. दिनांक 11 ते 13 जून २०२४ पर्यंत इच्छुक पालकांनी व विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या लिंक वरती ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरावा.
ज्या विद्यार्थ्यांना वस्तीगृहामध्ये राहण्याची सुविधा आवश्यक आहे अशा विद्यार्थ्यांची ११ ते १३जून २०२४ रोजी नाणीज येथे प्रत्यक्ष लेखी परीक्षा घेतली जाईल। १५ जून २०२४ रोजी विद्यार्थी निवड यादी जाहीर केली जाईल. वस्तीगृहाची सोय फक्त मुलांकरिता उपलब्ध आहे, मुलींकरिता नाही, याची नोंद घ्यायची आहे.
प्रवेश फॉर्म भरण्यासाठी लिंक https://jnmei.jnms.org/admission.html