महाराष्ट्र

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून मुंबईत ४१ वे मरणोत्तर देहदान

नाणीज : जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून, मरणोत्तर देहदान उपक‘मांतर्गत ४१ वे देहदान आज साकिनाका, मुंबई येथे झाले. येथे निधन झालेल्या कै. रुक्मिणी संपत कुंभार (वय ६२) यांचे पार्थिव त्यांच्या इच्छेनुसार मुंबईतील टोपीवाला मेडिकल कॉलेज, नायर चॅरिटेबल हॉस्पिटलकडे सोपविण्यात आले.


या बाबतची माहिती अशी- जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या भक्त कै. रुक्मिणी संपत कुंभार यांचे आज निधन झाले. त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पती श्री संपत बाबुराव कुंभार, मुलगा समीर संपत कुंभार यांनी त्यांचा देह महाविद्यालायाच्या शरीरशास्त्र विभागाकडे सुपूर्द केला. तेथील डॉ. युवराज भोसले, डॉ. लक्ष्मण धुरी यांनी तो स्वीकारला.
जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी स्वस्वरूप संप्रदायाला मृत्यूनंतरही देहदान करून समाजाच्या उपयोगी पडण्याचे आवाहन केले होते. आपल्या प्रत्येक प्रवचनातून त्यांनी हे आवाहन केले होते. ‘‘मरणानंतर देह मातीमोल होण्यापेक्षा त्याचा उपयोग वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, अर्थात भावी डाक्टरर्सना शरीरशास्त्र शिकण्यासाठी होऊ शकतो. जगावे परी किर्तीरुपी उरावे. जन्म म्हटलाकी मृत्यू अटळ आहे. एक ना एक दिवस या जगाचा निरोप घेऊन सर्वांनाच जायचे आहे. गेल्यावर सुद्धा आपले नाव आजरामर होण्यासाठी आपण देहदान करून समाजाच्या उपयोगी पडावे.‘‘ जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या आवाहनास भाविकांची मोठा प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातून ५६५३७ जणांनी मरणोत्तर देहदानाचे अर्ज भरून दिले होते. हे अर्ज त्या त्या विभागातील वैद्यकीय महाविद्यालायांकडे यापूर्वीच सुपूर्द करण्यात आले आहेत.

मुंबई साकिनाका येथे कै. रुक्मिणी संपत कुंभार यांचे पार्थिव वैद्यकीय महाविद्यालायाकडे सुपूर्द केल्यानंतर नातेवाईक, स्वस्वरूप संप्रदायाचे पदाधिकारी यांच्या समक्ष देहादान प्रमाणपत्र नातेवाईकांना दिले जात असताना.

आजपर्यंत ४१ जणांनी मरणोत्तर देहदान केले आहे. कै. रुक्मिणी कुंभार यांनीश्रींच्या प्रेरणेने आणि त्यांच्या मरणोत्तर देहदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत संस्थानकडे अर्ज भरून दिला होता. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेतून आत्तापर्यंत ४१ जणांनी देहदान केले आहे. कै. रुक्मिणी यांचा देह मुंबईतील टोपीवाला मेडिकल कॉलेज, नायर चॅरिटेबल हॉस्पिटलकडे सोपविण्यात आला.
देहदानासाठी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचे त्या त्या भागातील अनुयायी पुढाकार घेत असतात. देहदान करतेवेळी कै. रुक्मिणी यांचे पती संपत बाबुराव कुंभार, मुलगा समीर संपत कुंभार, भाऊ महादेव मारुती कुंभार, स्वस्वरूप संप्रदायाचे मुंबई जिल्हा निरीक्षक मनोज पाडावे, मुंबई जिल्हा अध्यक्ष विलास कुळे, सामाजिक उपक‘म प्रमुख समीर कडव, तालुका अध्यक्ष संजय बरजे, विकास भोसले, दिलीप जाधव आदी उपस्थित होते. यावेळी डॉक्टरांच्या हस्ते देहदान प्रमाणपत्र नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button