कोकणदेश-विदेशमहाराष्ट्रराजकीय

ठाकरे शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्यासह आणखी एका उमेदवाराने भरला अर्ज!

लोकसभा निवडणूक – 2024


रत्नागिरी, दि. १६ : नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी विनायक भाऊराव राऊत यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष एकूण ३ नामनिर्देशन पत्र दाखल केले. तसेच अमृत अनंत तांबडे यांनी अपक्ष १ नामनिर्देशन पत्र दाखल केले. अशी एकूण दोन उमेदवारांनी ४ नामनिर्देशन पत्रे मंगळवारी  दाखल केली.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या  निवडणुकीसाठी आजपर्यंत एकूण तीन उमेदवारांची ५ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button