देवरूखचा राहुल पोकळे एम. फार्मा परिक्षेत म्हैसूर विद्यापिठात पहिला
असा मान मिळविणारा राहुल कोकणातील पहिला विद्यार्थी

देवरुख (सुरेश सप्रे) : देवरूख येथील येथील प्रसिद्ध व्यापारी उदय प्रभाकर पोकळे यांचे चिरंजीव राहुल पोकळे याने जे एस एस कॉलेज ऑफ फार्मसी, मैसूर येथून मास्टर ऑफ फार्मसी (M Pharm ) मध्ये विशेष प्राविण्यासह 98.5 टक्के गुण मिळवून विद्यापीठात पहिला येण्याचा मान मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
देवरूखातील जुन्या काळातील व्यापारी प्रभाकर पोकळे व काँग्रेसचे नेते उद्योजक कांता पोकळे यांचा राहूल हा नातू आहे. प्राथमिक माध्यमिक शिक्षण देवरूखात घेतलेवर त्याने पुढील शिक्षणासाठी तो बंगळूरु येथे गेला. त्या विद्यापीठात प्रथम येणारा तो कोकणातील पहिलाच विद्यार्थी असल्याने त्याने आपल्यासह जिल्हय़ाचे नावलौकिकात भर घातली आहे. त्याच्या या यशाचा व कर्तुत्वाचा देवरूखवासीयांना सार्थ अभिमान आहे. राहूल याचे सर्वत्र विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.



