लांजा तालुक्यात नावेरी नदीवर प्रथमच साकारतोय ‘आर्च ब्रिज’

लांजा : लांजा तालुक्यात प्रथमच कुरंग येथे नावीन्यपूर्ण असा कमानी पूल साकारला जात आहे. या पुलाचे काम प्रगती पथावर आहे. कमानी पद्धतीचा (Arch Type) पूल आहे. त्याचे ड्रॉइंग मॉडर्न आर्च इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने बनवले आहे. या पुलाला दोन गाळे असून, पावसाचे पाण्याने वाहतुकीस काहीही अडचण येणार नाही, असे त्याचे डिझाईन आहे.
पुलाच्या बांधकामामुळे कुरंग गावातील ग्रामस्थांना पावसाळ्यात वाहतुकीची अडचण येणार नाही. सहयाद्री पायथ्याशी असलेल्या कुरंग गावात पावसाळ्यात येथील वरची वाडी, कदमवाडी आदी वाडी ,वस्ती चा दळणवळण चा संपर्क तुटत असे ग्रामस्थांची पुरामुळे मोठी गैरसोय होत असे. अनेक वर्षची पुलाची मागणीची पूर्तता होत आहे आर्च कमानी पूल ही पद्धत किफायतशीर आहे. अभियांत्रिकीचा हा नाविन्यपूर्ण असा पद्धत आहे. पुलाची लांबी 30 मीटर आणि उंची 4.3 मीटर आहे. लांजा तालुक्यातील कुरंग गावामध्ये नावेरी नदीवर कमानी पद्धतीचा (Arch Type) पूल साकार होत आहे.



