कोकणदेश-विदेशब्रेकिंगमनोरंजनमहाराष्ट्र

पश्चिम किनारपट्टीवर आज त्सुनामीबाबत रंगीत तालीम


नागरिकांनी घाबरून जाऊ नये : जिल्हाधिकारी

रायगड दि. 10–संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) तसेच इंडिअन नॅशनल सेंटर फॉर ओशियन सर्व्हिसेस (INCOIS) हैद्राबाद यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 11आक्टोबर 2023 रोजी सकाळी 11.30 वा पासून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर त्सुनामीबाबत रंगीत तालीम (Mock Drill) करण्यात येणार आहे. त्सुनामीबाबत रंगीत तालीम असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी केले आहे.

सदर रंगीत तालीमव्दारे शासकीय यंत्रणांतील संपर्क व समन्वय यंत्रणा तपासणीचा हेतू असणार आहे. त्सुनामीचे बुलेटिन दर एक तासाला इमेलव्दारे प्राप्त होतील. सदर ईमेल केंद्र, राज्य, जिल्हा व तालुकास्तरापर्यंत सर्व विभागांना पाठविण्यात येतील. सदर रंगीत तालीममध्ये सर्व विभाग विशेषत: प्रादेशिक बंदर अधिकारी, रायगड, सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय विभाग, रायगड, बंदर निरीक्षक, तहसिलदार, पोलीस विभाग, रायगड, इंडियन कोस्ट गार्ड, मुरुड इ.सहभागी होणार आहेत.

इराण जवळीळ (माकरण फॉल्ट लाईन) येथे समुद्रतळाशी भुकंम्प होऊन अरबी समुद्रात त्सुनामी लाटा उसळणार असून पश्चिम किनाऱ्यावर धडकणार असल्याचे बुलेटिन 11.30 वा.पासून दर एक तासाला इमेल द्वारे, एस.एम.एस.व्दारे सर्व शासकीय यंत्रणांना देण्यात येणार आहे.

या सरावात इराण N4 (Co.8) च्या 9.0 तीव्रतेच्या भूकंपाचे झाल्याचे नोंद होईल. मकरन ट्रेंच 11 ऑक्टोबर 2023 रोजी 1130 तास IST वाजता सुरू होईल. IOWave23 सरावाचा उद्देश संभाव्य विनाशकारी त्सुनामीला प्रतिसाद देण्यासाठी IOTWMS, राष्ट्रीय सुनामी चेतावणी केंद्रे, राष्ट्रीय/राज्य/स्थानिक आपत्ती व्यवस्थापन संस्था (DMO) आणि इतर संबंधित प्राधिकरणांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन आणि सुधारणा करणे हा आहे. हा सराव आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना त्यांच्या संप्रेषणाच्या ऑपरेशनल लाइन्सची चाचणी घेण्याची, त्सुनामी चेतावणी आणि आपत्कालीन प्रतिसाद मानक कार्यप्रणालींचे पुनरावलोकन करण्याची आणि आपत्कालीन तयारीला प्रोत्साहन देण्याची संधी प्रदान करेल. यासाठी नियमित सराव महत्त्वाचा आहे

रायगड जिल्हयाला लाभलेल्या अरबी समुद्राच्या किनारपट्टीवरील संभाव्य आपत्तीप्रवणता विचारात घेता नागरिकांनी त्सुनामी आपत्तीविषयी अधिक माहिती घेवून नेहमी सतर्कत राहणे आवश्यक आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button