पालकमंत्री उदय सामंत शनिवारपासून रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

रत्नागिरी, दि.23 : उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे जाहीर झाला आहे.
शनिवार 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता मेंगलोर (कर्नाटक) विमानतळ येथे आगमन व विमानाने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 11.15 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व मोटारीने जनसंपर्क कार्यालय, रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता भेटीसाठी राखीव. (स्थळ : जनसंपर्क कार्यालय, जयस्तंभ). दुपारी 3 वाजता रत्नागिरी विमानतळ येथून मुंबईकडे प्रयाण.
रविवार 26 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.55 वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. पहाटे 5.15 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वाजता राखीव (स्थळ : पाली, ता.जि. रत्नागिरी) सकाळी 11 वाजता जात पडताळणी संदर्भात आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय) दुपारी 12 वाजता रत्नागिरी जिल्हा पाणी टंचाई आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय) दुपारी 2 वाजता रत्नागिरी तालुका पाणी टंचाई आढावा बैठक तसेच अमृत महा आवास अभियान २०२२-२३ पुरस्कार वितरण सोहळा (स्थळ: शामराव पेजे सभागृह, जि.प. रत्नागिरी ) दुपारी 3 वाजता प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना जिल्हा अंमलबजावणी समिती आढावा बैठक (स्थळ: शामराव पेजे सभागृह, जि.प. रत्नागिरी) सायंकाळी 5 वाजता रत्नागिरी शहर महिला बचत गट विक्री केंद्र भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: आठवडा बाजार, रत्नागिरी शहर) सांयकाळी सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.
सोमवार 27 नोव्हेंबर रोजी सकाळी10.30 वाजता जि.प. महिला बचत गट केंद्र भूमी पूजन (स्थळ : पाली, ता.जि. रत्नागिरी) दुपारी 12.30 वाजता जि.प. महिला बचत गट केंद्र भूमी पूजन (स्थळ: खालगांव, ता. जि. रत्नागिरी) दुपारी 2.30 वाजता जि.प. महिला बचत गट केंद्र भूमी पूजन (स्थळ : कोतवडे, ता.जि. रत्नागिरी). दुपारी 4.30 वाजता रत्नागिरी जि.प. कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय अधिकारी / कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभास उपस्थिती (स्थळ : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे जवाहर क्रिंडागण) सायंकाळी सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. रात्रौ 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने रत्नागिरी रेल्वे स्थानककडे प्रयाण. रात्रौ 10.55 वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
- हेही अवश्य वाचा : Konkan Railway | रत्नागिरी-वैभववाडी दरम्यान १ डिसेंबरला रेल्वेचा अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’
- Konkan Railway | तीन महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ८६ लाख ६७ हजारांचा दंड वसूल
- Konkan Railway | ख्रिसमससाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी चार विशेष गाड्या



