कोकणदेश-विदेशमहाराष्ट्रशिक्षण

फॉन तर्फे राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा

उरण दि. ६ (विठ्ठल ममताबादे ) : भारतभर दरवर्षी ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह ( Wildlife Week) म्हणून साजरा केला जातो. भारतातील वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण आणि संवर्धन तसेच नामशेष होत चाललेल्या वन्य पशुपक्ष्यांबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो.

या वर्षी 2 ते 8 ऑक्टोबर मध्ये वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. 2023 मध्ये 69 वा वन्यजीव सप्ताह साजरा होत आहे. दि 5 ऑक्टोबर रोजी वन्यजीव सप्ताह 2023 निमित्ताने फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) चिरनेर उरण,रायगड व गुळसुंदे गावातील सेवाभावी व्यक्ती किरण मोरे,अजिंक्य सुर्वे आणि मंगेश ठोकळ यांच्या सहकार्यातून गुळसुंदे शाळा येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकूण 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व निसर्ग विषयक चित्रे काढली.

तसेच विद्यार्थ्यांना वन्यजीवांची ओळख व माहिती,जैवविविधता संवर्धन या विषयावर कु.प्रथमेश मोकल, सदस्य फ्रेंड्स ऑफ नेचर चिरनेर उरण,रायगड ह्यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण हे लोकसहभागातूनच शक्य आहे. त्यासाठी शासनास व वनविभागास लोकांचे सहकार्य आवश्यक आहे.

दोन्ही कार्यक्रमांस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तसेच शाळेच्या शिक्षिका अर्चना दीक्षित यांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यास मोलाचे सहकार्य केले.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button