कोकणमहाराष्ट्र

भाजपाची संगमेश्वर (दक्षिण) तालुका कार्यकारिणी जाहीर

तालुक्याच्या इतिहासात प्रथमच जंबो कार्यकारिणी

देवरूख (सुरेश सप्रे) : भाजपाचे कोकणचे नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली, रत्नागिरी (द.) भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत व चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी संगमेश्वर (दक्षिण) तालुक्याची सर्वसमावेशक जंबो कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

ही कार्यकारिणी तयार करताना सामाजिक स्थान, कार्यक्षमता आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या कार्यासाठी वेळ देण्याची तयारी या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला गेलाआहे.

नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा समतोल राखण्यासाठी ज्येष्ठ मंडळींचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले जाणार आहे. तसेच संपूर्ण कार्यकारिणी हे एक कुटुंब असून त्यांचा कुटुंबप्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. येत्या तीन वर्षांसाठी मी व माझे सहकारी संघटनेसाठी राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन काम करून पक्षाला तालुक्यात वेगळ्या उंचीवर नेणेसाठी प्रयत्न करीन असे नूतन तालुकाध्यक्ष रूपेश कदम यांनी सांगितले.
या नूतन जंबो कार्यकारणीत १० उपाध्यक्ष, ३ सरचिटणीस. १ कोषाध्यक्ष व ९ चिटणीस असून ८० जणांची सदस्य म्हणून नेमणुक केली आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button