
मडगाव : गेल्या अनेक दिवसांपासून कोकणवासियांकडून प्रतीक्षा केल्या जाणाऱ्या मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 वाजून 47 मिनिटांनी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वागतासाठी कणकवली, रत्नागिरीसह खेड स्थानकांवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. शुभारंभ होणारे गोव्यातील मडगाव स्थानक आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे. गोवा वासियांमध्ये वंदे भारत व प्रचंड उत्सुकता आहे.
संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या महाराष्ट्रातील पाचव्या बंदे भारत एक्सप्रेस ला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्य प्रदेशातील भोपाळ स्थानकावरून आज दिनांक 27 जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून मुंबईला रवाना करणार आहे. दरम्यान स्वागतासाठी मडगाव स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस सजवण्यात आली असून ती सुटणार असलेल्या प्लॅटफॉर्मवर देखील आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सकाळी दहा वाजून 47 मिनिटांनी पंतप्रधान वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन करणार आहेत.




