कोकणमहाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटासह कुंभार्ली घाटात दरड कोसळली ; वाहतूक विस्कळीत

  • चिपळूण, खेडला पुराच्या पाण्याचा वेढा
  • मुंबई- गोवा महामार्गावर परशुराम घाटात सायंकाळी एकेरी वाहतूक सुरु
  • राजापुरातही अर्जुना कोदवली नदीचे पाणी शहरात शिरले
  • हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार नागरिक अलर्ट मोडवर


रत्नागिरी : हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार कालपासून कोसळत असलेल्या पावसामुळे खेडच्या जगबुडी नदीला पूर आल्याने जगबुडी नदीचे पाणी शहरात शिरू लागले आहे. चिपळूणमध्ये देखील वाशिष्ठी नदीला पुराच्या पाण्याने ग्रासल्याने शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे तेथील नागरिक सध्या या दोन्ही ठिकाणचे नागरिक अलर्ट मोडवर आहेत.

संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील मुंबई -गोवा महामार्गावर गडनदीचे पाणी आता धोका पातळीवर आहे. दक्षता म्हणून एक मार्गी वाहतूक सुरू ठेवली आहे.

संगमेश्वर मध्ये आरवली येथे गड नदीला आलेला पूर

जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती बघता प्रशासनाने चिपळूणमध्ये एन डी आर एफ ची तुकडी तैनात ठेवली आहे. अशातच खेड मधून वाहणाऱ्या जगबुडी नदीला पूर आल्यामुळे पुराचे पाणी शहरात शिरू लागले आहेत.
चिपळूण शहरातून वाहणारी वाशिष्ठी नदी देखील तुडुंब भरून वाहत आहे. या नदीचे पाणी बाजार पुलातला लागल्याने तेथे देखील पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुसळधार पाऊस सुरू असताना मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात परशुराम मंदिराकडील बाजूच्या लेनवर दरड कोसळली आहे. परशुराम घाटातून जाणारा हा महामार्ग चौपदरी बनवण्यात आल्याने पावसामुळे कोसळलेली दरड एका लेन वर आली आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक वाशिष्टी नदीच्या बाजूने असलेल्या मार्गिकेवरून खबरदारी घेऊन सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button