कोकणमहाराष्ट्र

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची उद्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून पाहणी

रत्नागिरी दि. 29 : राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री पालघर व सिंधुदूर्ग रविंद्र चव्हाण हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात ते लांजा तालुक्यातील वाकेड पासून रायगड जिल्ह्यातील भोगावपर्यंत मार्गाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करून ठेकेदार कंपन्यांना सूचना देणार आहेत.

मंगळवार 30 मे 2023 रोजी सकाळी 10.30 ते 11.00 वाजता मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज 8 तळगाव ते वाकेड या 35 कि.मी. ची पाहणी. सकाळी 11.00 ते 12.00 वाजता मुंबई-गोवा महामार्ग पॅकेज 7 वाकेड ते कांटे या 51 किमी ची पाहणी. दुपारी 12.00 ते 01.00 वाजता मुंबई गोवा महामार्ग पॅकेज 6 कांटे ते आरवली या 40 कि.मी. ची पाहणी. दुपारी 01.00 ते 02.00 वाजता मुंबई गोवा महामार्ग पॅकेज 5 आरवली ते चिपळूण या 25 किमी ची पाहणी. दुपारी 02.00 ते 03.00 वाजता चिपळूण शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 03.00 ते 03.30 वाजता मुंबई-गोवा महामार्ग चिपळूण ते परशुराम घाट या 11.40 कि.मी. ची पाहणी. दुपारी 03.30 ते 04.15 वाजता मुंबई गोवा महामार्ग पॅकेज 4 परशुराम घाट ते कशेडी घाट या 42.30 किमी ची पाहणी. दुपारी 04.15 ते 05.00 वाजता मुंबई गोवा महामार्ग पॅकेज 3 कशेडी घाट ते भोगाव खुर्द या 13 किमी ची पाहणी.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button