आरोग्यकोकणमहाराष्ट्र
मुख्यमंत्र्यांकडून आ. योगेश कदम यांच्या प्रकृतीची घरी जाऊन विचारपूस
मुंबई : दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम हे गेले काही दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल होते. कालच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. घरी परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार योगेश कदम यांना प्रकृतीची काळजी घेऊन लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे, आणि पुन्हा एकदा त्याच जोमाने लोकसेवेसाठी कार्यरत व्हावे, असा सल्ला दिला.