कोकणक्रीडाविश्वमहाराष्ट्रशिक्षण
भारत शिक्षण मंडळ कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळाच्या नाटेकर, गांधी, कीर कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. वर्षा जोशी, क्रीडा विभागप्रमुख श्री. मांजरेकर ,पटवर्धन हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्रीपाद गुरव, सौ. शुभांगी शिंदे, सौ. बेटकर, सौ. रोकडे, कल्पना नागवेकर, क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.
उपस्थित सर्व शिक्षकांचे श्री. मांजरेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .सौ. शुभांगी शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.



