रत्नदुर्ग किल्ल्यावरील शिवसृष्टीचा उद्या भूमिपूजन सोहळा
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ

रत्नागिरी,दि.२३ : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नदूर्ग किल्ला येथे शिवसृष्टी साकार होत आहे. रत्नागिरी नगर परिषद वैशिष्टपूर्ण विशेष अनुदान योजनेंतर्गत रत्नदूर्ग येथे शिवसृष्टी निर्माण करणे, या विकासकामाचा भूमिपूजन सोहळा रत्नदूर्ग किल्ला, रत्नागिरी येथे बुधवार, 24 मे 2023 रोजी सायंकाळी 06.00 वाजता राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत, विशेष निमंत्रित सदस्य, सिंधूरत्न समृध्द योजना किरण सामंत, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तया सोहळयास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तुषार बाबर प्रशासक तथा मुख्यधिकारी रत्नागिरी यांनी केले आहे.



