कोकणमहाराष्ट्रराजकीय
निवडणूक आयोगाच्या गैरकृत्यांविरोधात ठाणे शहर काँग्रेसचे निषेध आंदोलन

- काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या उपस्थितीत आंदोलन
ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या गैरकृत्यांविरोधात, लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी ठाण्यात शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य मो. नसीम खान, यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निषेध आंदोलन करण्यात आले.



