देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र
रत्नागिरीच्या ८५ वर्षीय आजींनी घरातूनच बजावला मतदान हक्क!
- घरातून मतदान सोय केल्यामुळे आठल्ये आजींनी मानले निवडणूक आयोगाचे आभार
रत्नागिरी : घरातूनच गुप्त मतदान पद्धतीने मतदान करण्याची सुविधा यावेळी निवडणूक आयोगाने उपलब्ध केल्याने या सुविधेचा लाभ घेतलेल्या रत्नागिरीतील ८५ वर्षीय आजींनी भारत निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत.
इच्छा असून देखील वयामुळे, शारीरिक व्याधीमुळे मतदान केंद्रांपर्यंत जाता येत नाही. माझ्यासारखे असे अनेकजण आहेत. अशा ८५ वर्षांपुढील मतदारांसाठी गृह मतदानाची भारत निवडणूक आयोगाने सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर येथील पद्मा आठल्ये (वय 87) यांनी धन्यवाद दिले.
निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी या गृह मतदानावेळी भेट देऊन नियोजन विशेषत: गोपनीयतेबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी केली.