दिल्ली आकाशवाणीकडून रत्नागिरीच्या अवधूत बाम यांना ‘टॉप ग्रेड’ प्रदान
रत्नागिरी : आकाशवाणीचे सेवानिवृत्त कलाकार अवधूत अनंत बाम यांना आकाशवाणी दिल्ली केंद्राकडून सन्मानपूर्वक टॉप ग्रेड प्रदान करण्यात आली आहे. यामुळे आता संगीत क्षेत्रात पंडित अवधूत अनंत बाम अशी ओळख निर्माण झाली आहे.
‘ पंडित ‘ ही उपाधी मिळालेले अवधूत अनंत बाम हे कोकणातील एकमेव टॉप ग्रेड संगीतकार आहेत.
लहानपणापासून संगीत विषयाचा छंद असल्याने 1978 ते 1995 पर्यंत अस्थायी कलाकार आणि 1995 ते 2019 पर्यंत आकाशवाणी सेवेत रुजू होऊन आकाशवाणी रत्नागिरीच्या संगीत विभागात त्यांनी आपले योगदान दिले.
1978 पासून आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचा संगीत विभाग सुरू झाल्यापासून A ग्रेड सुगम संगीत गायक, तबला वादक आणि आता टॉप ग्रेड संगीतकार होण्याचा मान श्री. अवधूत अनंत बाम यांना मिळाला आहे.
श्री अवधूत अनंत बाम यांना कै. पंडित स्नेहल भाटकर आणि कै. पंडित परशुरामबुवा पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सांगितिक वाटचाल सुरू झाली.
- हे देखील वाचा : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग धामणी येथे खचण्याची भीती
- दिल्ली आकाशवाणीकडून रत्नागिरीच्या अवधूत बाम यांना ‘टॉप ग्रेड’ प्रदान
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही उपलब्ध
संगीतकार म्हणून नवनवीन चाली बांधताना पदमश्री पंडित श्री. उल्हास कशाळकर यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले.
पंडित अवधूत अनंत बाम यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.