कृषीकोकणमहाराष्ट्र

रत्नागिरी येथे आंबा बागायतदारांचा ७ नोव्हेंबरला मेळावा


रत्नागिरी, दि. ३१ : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील आंबा बागायतदारांसाठी ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेच्या कै. शामराव पेजे सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


या मेळाव्यामध्ये आंबा पिकावरील रोग-किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, आंबा पिकांसाठी मानांकन नोंदणी प्रमाणपत्र इ. विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील शास्त्रज्ञ आंबा पिकावरील कीड- रोगावरील उपाय योजनेसंबंधी मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त आंबा बगायतदारांनी मेळाव्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी केले आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button