कोकणदेश-विदेशमहाराष्ट्ररेल्वे
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!

- दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस आता तीन वातानुकलीत कोचसह धावणार!
रत्नागिरी : कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मडगाव सावंतवाडी तसेच सावंतवाडी दिवा दोन रेल्वे एक्सप्रेस गाड्यांमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवासादरम्यान आसन उपलब्धता वाढेल आणि प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास अनुभवता येणार आहे.रत्नागिरी पर्यटन
कोणत्या गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडले जाणार?
१. ट्रेन क्रमांक ५०१०८ / ५०१०७ मडगाव जंक्शन – सावंतवाडी रोड – मडगाव जंक्शन पॅसेंजर
- सध्याची डबा रचना: २ वातानुकूलित थ्री-टियर इकॉनॉमी डबे, १२ सामान्य डबे, १ जनरेटर कार आणि १ एसएलआर (एकूण १६ एलएचबी डबे).
- वाढवलेला डबा: १ वातानुकूलित थ्री-टियर इकॉनॉमी डबा.
- सुधारित डबा रचना: ३ वातानुकूलित थ्री-टियर इकॉनॉमी डबे, १२ सामान्य डबे, १ जनरेटर कार आणि १ एसएलआर (एकूण १७ एलएचबी डबे).
- प्रारंभ तारीख: ट्रेन क्रमांक ५०१०८ मडगाव जंक्शनहून १५/०७/२०२५ पासून, तर ट्रेन क्रमांक ५०१०७ सावंतवाडी रोडहून १६/०७/२०२५ पासून या नवीन डबा रचनेसह धावतील.
- २. ट्रेन क्रमांक १०१०६ / १०१०५ सावंतवाडी रोड – दिवा जंक्शन – सावंतवाडी रोड दैनिक एक्सप्रेस
- या ट्रेनमध्येही कायमस्वरूपी अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे. मडगाव येथून सावंतवाडीला आलेली गाडी पुढे सावंतवाडी ते दिवा अशी धावत असल्याने या दोन्ही गाड्यांची कोच रचना सारखी आहे
- प्रारंभ तारीख: सुधारित कोच रचनेनुसार ट्रेन क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोडहून १५/०७/२०२५ पासून, तर ट्रेन क्रमांक १०१०५ दिवा जंक्शनहून १६/०७/२०२५ पासून या नवीन डबा रचनेसह धावतील.
प्रवाशांना विनंती:
वरील गाड्यांचे विस्तृत थांबे आणि वेळापत्रकासाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. - या कायमस्वरूपी अतिरिक्त डब्यांमुळे गोवा आणि कोकण मार्गावरील प्रवाशांना निश्चितच दिलासा मिळेल आणि त्यांचा प्रवास अधिक सुखकर होईल अशी अपेक्षा आहे.
- हे देखील अवश्य वाचा : Konkan Railway | दादर- सावंतवाडी राज्यराणीला तुतारी एक्सप्रेस का म्हणतात?
- छोटा भीमचा रेल्वे प्रवाशांना मोठा संदेश!
- पनवेलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सप्टेंबरपासून उड्डाण!



