राष्ट्रीय मानव विकास संस्था नवी दिल्लीच्या वतीने सीएसआर फंड विषयी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

उरणमधील कामगार नेत्यांचा कार्यशाळेत सहभाग
उरण (विठ्ठल ममताबादे ) : मसूरी,उत्तराखंड येथील हॉटेल रामादा येथे राष्ट्रीय मानव विकास संस्था,नवी दिल्ली. यांच्या वतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) फंड या महत्त्वाच्या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत संपूर्ण देशातील महत्त्वाच्या २१ उद्योगातून अधिकारी – कर्मचारी सहभागी झाले होते.
या कार्यशाळेत सहा सत्रात तज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले.या मध्ये गायत्री सुब्रमण्य ,हितेंद्र मेहता, अमित गुप्ता , जी.पी.मदान इत्यादी तज्ञ मार्गदर्शक होते. सी एस आर फंडा हा समाजाच्या विकासासाठी वापरण्याचे बंधन महत्त्वाच्या मोठ्या शासकीय उद्योगांना आहे. या विषयीचे नियम, कार्यपद्धती व एकंदरीतच समाजाच्या विकासासाठी या फंडाचे योगदान याविषयी सखोल असे मार्गदर्शन झाले.
या प्रशिक्षण कार्यशाळेत जे एन पी ए च्या वतीने सुरेश पाटील – भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री व कामगार नेते यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी जे एन पी ए ने सी एस आर फंडाच्या माध्यमातून येथील स्थानिक रायगड जिल्ह्याच्या व देशाच्या सामाजिक विकासासाठी दिलेले योगदान या कार्यशाळेत अधोरेखित केले.



