लायन्स क्लबमार्फत मोरा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मोफत वाटप
उरण दि ३१ (विठ्ठल ममताबादे) : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231 A4 यांच्याकडून जे. एम. म्हात्रे प्राथमिक व माध्यमिक शाळा, मोरा – उरण या शाळेतील बालवाडी, पहिली ते चौथी व पाचवी ते दहावी अशा गरीब गरजू विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षी लायन्स क्लब ‘भुका न रहे कोई ‘ या ग्रुपतर्फे शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना २५० गणवेशाचे वाटप करण्यात आले.
लायन्स क्लब ग्रुपचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन एस. आर.परमेश्वर, लायन धरवानी, लायन विजय गनात्रा, लायन मिलिंद पाटील, लायन रमाकांत म्हात्रे, लायन दत्तात्रेय कोळी, लायन सागर चौरकर, मोनिका डावरे, सीमा घरत , लायन क्लबचे सर्व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले.या गणवेशांचे वाटप करण्यासाठी लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून गणवेशाचे वाटप केले.
प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक साईनाथ गावंड यांनी आपल्या मनोगतातून म्हटले की या शाळेमध्ये आज गरीब गरजू विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे गणवेश वाटप होय. गणवेश वाटप केल्यामुळे लायन क्लबचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर यांनी आपल्या मनोगतातून शालेय प्रगती संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून गणवेश देणाऱ्या लायन क्लबचे आभार व्यक्त केले.
या प्रसंगी लायन ग्रुपचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन एस आर परमेश्वर, लायन मिलिंद पाटील, लायन रमाकांत म्हात्रे, माध्यमिक शाळेचे चेअरमन पी. एम. कोळी, प्राथमिक शाळेचे चेअरमन चंद्रकांत कोळी,प्रभारी मुख्याध्यापक साईनाथ गावंड, सहाय्यक शिक्षक सुगिंद्र म्हात्रे, अनिल पाटील, स्वप्निल नागमोती, शिंदे मॅडम, घरत मॅडम, सुनीता पाटील , राणी कदम, सुप्रिया मुंबईकर, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधिर मुंबईकर, रुपाली चौधरी, श्रीम. कोल्हे, शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाची सजावट घनश्याम म्हात्रे व दिनेश पाटील यांनी केली. सूत्रसंचालन मनोज म्हात्रे यांनी केले.आभार सहाय्यक शिक्षक अनिल पाटील यांनी करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.