विकासकामे गुणवत्तापूर्ण व्हावीत : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी दि.१० : जिल्हयातील विविध गावागावांमध्ये होत असलेले विकास कामे ही उत्तम गुणवत्तेची तसेच पारदर्शकपणे होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. चाफेरी येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाला चाफेरी सरपंच अंजली कांबळे,उपसरपंच अमित पायरे,अनिता बैकर, नंदू केदारी,शिल्पा सुर्वे,केतन शेट्ये, तुषार साळवी, प्रशांत घोसाळे, योगेंद्र कल्याणकर,कांचन नागवेकर,विवेक सुर्वे,राजू साळवी उपस्थित होते.
चाफेरी येथे मंजूर निधीतून जयगड मेन रोड ते अविनाश केदारी यांचे घराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, चाफेरी बौध्दवाडी ते गवळीवाडी रस्ता तयार करणे,चाफेरी येथे नळपाणी पुरवठा योजना करणे, चाफेरी बौध्दवाडी ते गवळीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, चाफेरी, कासारी, सांडेलावगण रस्ता डांबरीकरण नुतनीकरण करणे ग्रामा १३६ टप्पा १, चाफेरी, कासारी, सांडेलावगण रस्ता डांबरीकरण नुतनीकरण करणे आदि विकास कामे प्रस्तावित असून यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी सुमारे ६ कोटी ९१ लाखाचा निधी मंजूर केल्याचे सांगितले.
चाफेरी नंतर पालकमंत्र्यांनी कासारी सांडेलावगण, जयगड, साखर मोहल्ला, रीळ, वरवडे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटने केली. यावेळी स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.