विज्ञान प्रदर्शनामध्ये रत्नागिरी तालुक्यातील पिता पुत्राची भरारी !
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्याचे ५० वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कसोप फणसोप येथे नुकतेच पार पडले. यात फरहान इम्तियाज शेख ( सी. बी एस. ई. ) फातीमा कॉन्व्हेन्ट स्कूल , याने उच्च प्राथमिक स्तरातून विज्ञान प्रतिकृती (मोबाईल इनव्हर्टर ) मांडले होते. याला द्वितीय क्रमांक मिळुन जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे तर इम्तियाज कुतबुदिन शेख ए. डी. नाईक हायस्कूलचे (कलाध्यापक ) यांनी माध्यमिक गटातून, ( साऊंड वेव्हज एन्ड साऊंड पॉल्युशन) हे शैक्षणिक साहित्य प्रदर्शनामध्ये मांडले होते. या शैक्षणिक साधनची देखील द्वितीय क्रमांकाने सन्मानीत करून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
एकाच मंचावर पिता – पुत्राने द्वितीय क्रमांक पटकावून सन्मान स्विकारुन, जिल्हास्तरासाठी निवड होण्याच्या बहुमान किंवा योग्य क्वचित येतो .
विज्ञानप्रेमी शिक्षक, मित्र परिवार यांनी शेख पिता पुत्राच्या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष मुनीर शेख , मुख्याध्यापक समीर गडबडे तसेच प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .