‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या नियोजनार्थ दापोलीत बैठक
पालकमंत्री उदय सामंत यांचे मार्गदर्शन
दापोली : महाराष्ट्र शासनाच्या “शासन आपल्या दारी” या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या नियोजनासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांनी आज श्री शिवछत्रपती सभागृह, दापोली येथे आढावा बैठक घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, दापोली उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले, खेड उपविभागीय अधिकारी श्रीमती राजश्री मोरे व इतर अधिकारी-कर्मचारी, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम
रत्नागिरी येथे दिनांक 25 मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी चाहा भव्य दिव्य कार्यक्रम असणार आहे. याच्या नियोजनार्थ रत्नागिरी येथे जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी देखील नुकतीच बैठक पार पडली. या कार्यक्रमात जिल्ह्याच्या इतर तालुक्यांच्या सहभागाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या ना. उदय सामंत यांनी दापोली येथे मंगळवारी ही बैठक घेतली.