शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी रत्नागिरी येथे बैठक
पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला आढावा

रत्नागिरी : जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे
“शासन आपल्या दारी” या उपक्रमाच्या नियोजनासंदर्भात तसेच जलयुक्त शिवार टप्पा-२, गाळमुक्त धरण, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व मान्सूनपूर्व तयारी-2023 या विषयांबाबत गुरुवारी आढावा बैठक घेतली.
या बैठकीस जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पूजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी तसेच विविध शासकीय विभागांचे विभाग व कार्यालयप्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यात होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्या दृष्टीने या कार्यक्रमाचे नियोजन सुरू आहे.



