कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसाहित्य-कला
सांस्कृतिक केंद्र दुरुस्ती भूमिपूजनाचा मान कलाकाराला!

चिपळूण (सुरेश सप्रे ) : चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र अनेक वर्षे दुरूस्तीअभावी बंद होते. नाट्य रसिक व जिल्हय़ाचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी हे केंद्र सुरू व्हावे, यासाठी निधीची तरतुद केलेने त्या केंद्राच्या दुरुस्तीच्या उर्वरित काम व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्याप्रसंगी भुमिपुजन करण्याची संधी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दै ‘सागर’चे पत्रकार व कलाकार असलेल्या योगेश बांडागळे यांना दिली व एका कलाकाराचा सन्मानच केला.
दरम्यान, चिपळूणचे सांस्कृतिक वैभव असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या भूमिपूजनाचा मान एका लोककलावंताला दिल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत व नगर पालिकेचे पत्रकारांनी मनापासून आभार मानले.



