कोकणमहाराष्ट्र
‘स्वच्छ रत्नागिरी’ मोहिमे अंतर्गत भिंती बोलू लागल्या!
रत्नागिरी : स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत शहरातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी नगर परिषदेने भिंतींची रंगरंगोटी करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे स्वच्छता संदेशांनी शहरातील रस्त्यांलगतच्या भिंती बोलू लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
निपूण कलाकारांच्या हस्त कौशल्यातून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक भिंतींचे सुशोभीकरण केले जात आहे. स्वच्छता अभियानात रत्नागिरी नगर परिषदेने या आधी देखील चांगली कामगिरी केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्येही नागरिकांनी नगरपरिषदेला शहर स्वच्छ ठेवण्यात सहकार्य करावे, असे आवाहन रत्नागिरी नगर परिषदेकडून करण्यात आले आहे