कोकणमहाराष्ट्ररेल्वे
कोकण रेल्वे मार्गावर धावणार वन वे स्पेशल ट्रेन!
खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवलीसह सावंतवाडीलाही थांबणार

रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव दरम्यान वनवे स्पेशल ट्रेन दिनांक 9 जून 2023 रोजी धावणार आहे.
गाडी क्रमांक ०११४९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन वन वे स्पेशल ट्रेन
या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०११४९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. ही एक दिशा मार्ग गाडी शुक्रवार, 09 जून 2023 रोजी मुंबई CSMT येथून 05:30 वाजता सुटेल आणि मडगाव जंक्शनला ती त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.
कोणकोणते आहेत थांबे?
ही विशेष गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आणि करमाळी स्थानकावर थांबणार आहे.
या गाडीला एकूण 16 एलएचबी कोच असतील. त्यात व्हिस्टाडोम: 01 कोच, एसी चेअर कार: 03 कोच, सेकंड सीटिंग : 10 कोच, एसएलआर – 01. जनरेटर कार: 01



