कोकणमहाराष्ट्र
उद्योगमंत्री उदय सामंत यांचा रत्नागिरीत नागरी सत्कार

रत्नागिरी : जिल्हा उद्योग विकास परिषद मध्ये एमआयडीसी रत्नागिरी येथे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्टिक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने उद्योजक दीपक गद्रे यांच्या हस्ते सन्मान पत्रक देऊन नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर,माजी आमदार हुस्नभानू खलीपे,दैनिक सागरचे संपादक राजू जोशी,फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्टिक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे अध्यक्ष ललित गांधी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.



